प्रेषितांचीं कृत्यें Chapter 24 MARIRV Bible Verse Images

प्रेषितांचीं कृत्यें 24 Bible Verse Pictures. Choose from a large collection of inspirational, motivational and encouraging Bible verses with pictures of nature. Download and share प्रेषितांचीं कृत्यें 24 inspirational Bible verse images. Bible verse pictures were created based on verses from the Indian Revised Version (IRV) - Marathi. IRV-Marathi Bible verse images were generated with permission from Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. (BCS).

Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.
Please remember to give attribution to Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. when using IRV-Marathi Bible Verse images. You can use CC-licensed materials as long as you follow the license conditions. One condition of all CC licenses is attribution.

Creative Commons License

Terms of Use: This work is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. It is attributed to Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. (BCS), and the Unified Scripture XML (USX) format version can be found on the Digital Bible Library website. All IRV-Marathi Bible verse images were generated with permission from Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. (BCS).

In addition, we would like to give very special thanks to eBible.org for making the Marathi Indian Revised Version Bible available in MySQL format.


प्रेषितांचीं कृत्यें 24:1 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
पाच दिवसानंतर महायाजक हनन्या, काही वडील आणि तिर्तुल्ल नावाचा कोणीएक वकील हे खाली आले; आणि त्यांनी सुभेदारापुढे पौलाविरुद्ध फिर्याद केली.

प्रेषितांचीं कृत्यें 24:2 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
जेव्हा पौल शासकासमोर उभा राहिला तेव्हा तिर्तुल्ल त्याच्यावर दोषारोप ठेवून म्हणाला, “फेलिक्स महाराज, आपल्यामुळे आम्हास फार शांतता मिळाली आहे आणि आपल्या दूरदर्शीपणामुळे या राष्ट्रात सुधारणा होत आहेत.

प्रेषितांचीं कृत्यें 24:3 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
म्हणून त्यांचे आम्ही पूर्ण कृतज्ञतेने, सर्व प्रकारे व सर्वत्र स्वागत करतो.

प्रेषितांचीं कृत्यें 24:4 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तरी आपला अधिक वेळ न घेता मी विनंती करतो की, मेहरबानी करून आमचे थोडक्यात ऐकावे.

प्रेषितांचीं कृत्यें 24:5 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
हा मनुष्य म्हणजे एक पिडा आहे असे आम्हास आढळून आले आहे आणि जगातल्या सर्व यहूदी लोकात हा बंड उठवणारा असून नासोरी पंथाचा पुढारी आहे.

प्रेषितांचीं कृत्यें 24:6 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
ह्याने परमेश्वराचे भवनही विटाळण्याचा प्रयत्न केला; त्यास आम्ही धरले; व आमच्या नियमाशास्त्राप्रमाणे याचा न्याय करण्यास आम्ही पाहत होतो.

प्रेषितांचीं कृत्यें 24:7 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
पण लुसिया सरदाराने येऊन मोठ्या जबरदस्तीने ह्याला आमच्या हातातून काढून नेले.

प्रेषितांचीं कृत्यें 24:8 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
आणि याची चौकशी आपण कराल तर ज्या गोष्टींचा दोषारोप आम्ही त्याच्यावर करतो त्या सर्वांविषयी त्याच्याकडूनच आपणाला समजेल.”

प्रेषितांचीं कृत्यें 24:9 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तेव्हा या सर्व गोष्टी अशाच आहेत, असे म्हणून दुसऱ्या यहूद्यांनी ही दुजोरा दिला.

प्रेषितांचीं कृत्यें 24:10 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
मग सुभेदाराने बोलण्यास खुणविल्यावर पौलाने उत्तर दिले, “आपण पुष्कळ वर्षापासून या लोकांचे न्यायाधीश आहात हे मला ठाऊक आहे, म्हणून मी आपल्यासंबंधीच्या गोष्टीचे संतोषाने समर्थन करतो.

प्रेषितांचीं कृत्यें 24:11 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
आपल्याला पूर्णपणे कळून येईल की, मला यरूशलेम शहरात उपासना करायला जाऊन अजून बारापेक्षा अधिक दिवस झाले नाहीत.

प्रेषितांचीं कृत्यें 24:12 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
आणि परमेश्वराच्या भवनात, सभास्थानात किंवा नगरात कोणाबरोबर वादविवाद करतांना किंवा बंडाळी माजवतांना मी त्यांना आढळलो नाही.

प्रेषितांचीं कृत्यें 24:13 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
ज्या गोष्टींचा दोषारोप ते माझ्यावर आता करत आहेत, त्या गोष्टी त्यांना आपणापुढे शाबीत करता येत नाहीत.

प्रेषितांचीं कृत्यें 24:14 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तरी मी आपणाजवळ इतके कबूल करतो की, ज्या मार्गाला ते पाखंड म्हणतात त्या मार्गाप्रमाणे जे जे नियमशास्त्रानुसार आहे व जे जे संदेष्ट्यांच्या लेखांत आहे त्या सर्वांवर विश्वास ठेवून मी पूर्वजांच्या देवाची सेवा करतो.

प्रेषितांचीं कृत्यें 24:15 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
आणि नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरुत्थान होईल, अशी जी आशा धरतात तीच आशा मी देवाकडे पाहून धरतो.

प्रेषितांचीं कृत्यें 24:16 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
ह्यामुळे देवासंबंधाने व मनुष्यांसंबंधाने माझा विवेकभाव सतत शुद्ध राखण्याचा मी यत्न करत असतो.

प्रेषितांचीं कृत्यें 24:17 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
मी पुष्कळ वर्षांनी आपल्या लोकांस दानधर्म करण्यास व यज्ञार्पणे वाहण्यास आलो.

प्रेषितांचीं कृत्यें 24:18 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
शुद्धीकरणाच्या विधीत मी व्रतस्थ असा परमेश्वराच्या भवनात आढळलो, माझ्याबरोबर लोकांचा घोळका नव्हता किंवा दंगा होत नव्हता; पण तेथे आशिया प्रांतातले कित्येक यहूदी होते.

प्रेषितांचीं कृत्यें 24:19 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
त्यांचे माझ्याविरूद्ध काही असते तर त्यांनी आपणा पूढे येऊन माझ्यावर दोषारोप करायचा होता.

प्रेषितांचीं कृत्यें 24:20 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
किंवा मी न्यायसभेपूढे उभा राहीलो असता माझा कोणता अपराध ह्यांना दिसून आला ते ह्यांनी तरी सांगावे;

प्रेषितांचीं कृत्यें 24:21 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
ह्यांच्यामध्ये उभे राहून, मरण पावलेल्यांचा पुनरुत्थानाविषयी माझा न्याय आज तुमच्यापुढे होत आहे, हे शब्द मी मोठ्याने बोललो, हा एवढा उद्गार अपराध असला तर असेल.”

प्रेषितांचीं कृत्यें 24:22 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
फेलिक्सास त्या मार्गाची चांगली माहीती असल्यामुळे त्याने खटला तहकूब करून म्हटले, “लुसीयाचा सरदार येईल तेव्हा तुमच्या प्रकरणाचा निकाल करीन.”

प्रेषितांचीं कृत्यें 24:23 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
आणि त्याने शताधिपतीला हुकुम केला की, ह्याला पहाऱ्यात ठेवावे; तरी ह्याला मोकळीक असावी आणि ह्याच्या स्वकीयांना याची सेवा करण्यास मनाई नसावी.

प्रेषितांचीं कृत्यें 24:24 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
मग काही दिवसानंतर फेलिक्स आपली यहूदी पत्नी द्रुसिल्ला हिच्यासह आला व त्याने पौलाला बोलावून ख्रिस्त येशूवरील विश्वासाविषयी त्याच्यापासून ऐकून घेतले.

प्रेषितांचीं कृत्यें 24:25 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तेव्हा नीतिमत्त्व, इंद्रियदमन व पुढे होणारा न्याय ह्यांविषयी तो भाषण करत असता, फेलिक्साने भयभीत होऊन म्हटले, “आता जा, संधी सापडली म्हणजे तुला बोलावीन.”

प्रेषितांचीं कृत्यें 24:26 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
आणखी आपणास पौलाकडून पैसे मिळतील अशी आशाही त्यास होती, म्हणून तो त्यास पुनःपुन्हा बोलावून घेवून त्याच्याबरोबर संभाषण करत असे.

प्रेषितांचीं कृत्यें 24:27 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
पुढे दोन वर्षांनंतर फेलिक्साच्या जागेवर पुर्क्य फेस्त हा आला; तेव्हा यहूद्यांची मर्जी संपादन करण्याच्या इच्छेने फेलिक्स पौलाला कैदेतच ठेवून गेला.

Available Bible Translations

American Standard Version (ASV)
Acts 24 (ASV) »
King James Version (KJV)
Acts 24 (KJV) »
GOD’S WORD® (GW)
Acts 24 (GW) »
Berean Bible (BSB)
Acts 24 (BSB) »
World English Bible (WEB)
Acts 24 (WEB) »
French Bible (LSG)
Actes 24 (LSG) »
Portuguese Bible (BSL)
Atos 24 (BSL) »
Spanish Bible (RVA)
Hechos 24 (RVA) »
Italian Bible (RIV)
Atti 24 (RIV) »
Chinese Simplified (CUVS)
使 徒 行 传 24 (CUVS) »
Chinese Traditional (CUVT)
使 徒 行 傳 24 (CUVT) »
Russian Bible (RUSV)
Деяния 24 (RUSV) »
Ukrainian Bible (UKR)
Дії 24 (UKR) »
Hungarian Bible (KAR)
Apostolok 24 (KAR) »
Bulgarian Bible (BULG)
Деяния 24 (BULG) »
Japanese Bible (JPN)
使徒行伝 24 (JPN) »

प्रेषितांचीं कृत्यें (MARIRV) Chapter Selection

MARIRV Book Selection List